'या' लोकांनी जवस खाणं टाळायला हवं 

जवस पौष्टिक असले तरी काही लोकांसाठी मात्र ते त्रासदायक ठरू शकतात.

त्यामुळे काही शारिरीक त्रास असणाऱ्या लोकांना डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय जवस खाऊ नये. किंवा ते अगदी मर्यादित प्रमाणातच खावे.

स्तनाचा कर्करोग किंवा गर्भाशयाचा कर्करोग असणाऱ्या महिलांनी जवसाचे सेवन करू नये. 

ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनीही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच जवस किती प्रमाणात खायला हवे ते ठरवावे.

ज्यांना पचनाचा नेहमीच त्रास होतो, अशा लोकांसाठीही जवस खाणे त्रासदायक ठरू शकते. 

जवसामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे ज्या लोकांना आधीच शुगर कमी असल्याचा त्रास असतो त्यांनीही सांभाळूनच जवस खावे.

Click Here