चहा हा अनेकांचा अतिशय आवडीचा. त्याचाच उपयोग करून आता वजन कसं कमी करायचं ते पाहा..
वाढतं वजन कमी करायचं असेल तर पुढे सांगितलेला चहाचा प्रकार तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो..
ग्रीन टी प्यायल्याने चयापचय क्रिया अधिक चांगली होते आणि शरीरावर अतिरिक्त चरबी साचत नाही.
आलं घालून केलेला चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पचन चांगलं झालं की आपोआप वजन नियंत्रित राहातं.
दालचिनीचा चहा प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहाते.
मेथी दाणे आणि बडिशेपेचा चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.