फळांवर स्टिकर्स का चिकटवले जातात? वाचा

fruit sticker meaning: फळावर चिकटवलेल्या स्टिकर्सचा नेमका अर्थ काय असतो? 

फळांवर चिकटवलेल्या स्टिकर्सवरील संख्यांना पीएलयू कोड म्हणतात.

किरकोळ विक्रेत्यांना बिलिंग करताना फळे आणि भाज्या ओळखण्यासाठी हे कोड वापरले जातात.

फळांची गुणवत्ता दर्शवण्यासाठी देखीला कोडचा वापर केला जातो.

हा कोड सहसा ४ किंवा ५ अंकांचा असतो. त्यातील पहिला अंक फळ कोणत्या पद्धतीने पिकवले गेले, याची माहिती देतो.

जर स्टिकरवर '९' ने सुरू होणारा पाच अंकी कोड असेल, तर, हे फळ नैसर्गिक पद्धतीने पिकवले गेले आहे.

फळांवर लावलेल्या स्टिकरवर चार अंकी कोड असेल तर याचा अर्थ फळ पारंपरिक पद्धतीने पिकवले गेले आहे.

तुम्हाला कधीकधी '८' ने सुरू होणारा पाच अंकी कोड देखील दिसू शकतो. याचा अर्थ ते फळ जनुकीय बदल करून तयार केलेले असते.

पुढच्या वेळी फळ खरेदी करताना स्टिकरवरील कोड नक्की तपासा

 चेहऱ्याला मुलतानी माती लावताना टाळा ७ चुका...

Click Here