जर तुम्ही सिंगल असाल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे मस्त आनंदात सेलिब्रेट करा..
तुमच्या आवडीचा मस्त एखादा सिनेमा पाहा.. एकट्याने जायला नको वाटत असेल तर घरीच ओटीटीवर एन्जॉय करा..
आपल्याला स्वत:साठी काहीतरी घ्यायचंच असतं. पण उगाच आपण ते लांबवत जातो. व्हॅलेंटाईन्स डे निमित्त स्वत:ला छान गिफ्ट देऊन टाका.
सिंगल लोकांचा एक ग्रुप तयार करा आणि सगळे मिळून मस्त एन्जॉय करा..
एखाद्या निवांत जागी एकटेच जाऊन बसा. स्वत:विषयी विचार करा. आपल्याला काय हवं काय नको ते पुन्हा एकदा स्वत:लाच विचारा. स्वत:शी संवाद साधा..
मस्त डेटवर जा. आणि स्वत:च्या आवडीचं सगळं काही खा, प्या.. संध्याकाळ एन्जॉय करा..