रोजमेरी तेलाचा केसांना नेमका काय फायदा होतो हे अनेकांना माहितीच नाही..
रोजमेरी तेलामुळे केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह चांगला होतो. त्यामुळे केसांना अनेक पौष्टिक घटक मिळून त्यांची मुळं पक्की होण्यास मदत होते.
रोजमेरी तेलामध्ये ॲण्टीफंगल, ॲण्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने डोक्यात कोंडा होत नाही.
केस गळणे किंवा केस तुटण्याचं प्रमाणही रोजमेरी तेलाच्या नियमित वापरामुळे खूप कमी होतं.
रोजमेरी तेलामुळे केसांना छान मॉईश्चर, हायड्रेशन मिळतं. त्यामुळे केस कोरडे होऊन त्यांना फाटे फुटत नाहीत.
नॅचरल पिगमेंट्स आणि ॲण्टीऑक्सिडंट्स रोजमेरी तेलात भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे केस पांढरे होण्याचं प्रमाण खूप कमी होतं.