बऱ्याचदा असं होतं की परफ्यूम मारूनही शरीराला येणारा घामाचा दुर्गंध काही कमी होत नाही.
अशावेळी चारचौघांसमोर मग प्रचंड अवघडल्यासारखं होतं. लाजिरवाणं वाटतं..
म्हणूनच शरीराला येणारी घामाची दुर्गंधी घालविण्यासाठी आता हा एक नैसर्गिक उपाय करून पाहा.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुरटीचा वापर करायचा आहे. शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी तुरटी खूप उपयुक्त ठरते.
हा उपाय करण्यासाठी तुरटीचा एक खडा घ्या. आंघोळीनंतर तो तुरटीचा खडा काखेत आणि ज्याठिकाणी जास्त घाम येतो, त्या शरीराच्या भागांवर चोळा.
तुरटीमुळे घाम येण्याचे प्रमाण तर कमी होईलच पण शरीराची दुर्गंधीही कमी होईल.
तुरटीचं पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ते दिवसातून २ ते ३ वेळा काखेमध्ये मारा. यामुळेही घाम येण्याचे प्रमाण आणि घामाची दुर्गंधी कमी होईल.