टोमॅटोच्या चटपटीत लोणच्याची सोपी रेसिपी

टोमॅटोची भाजी, चटणी नेहमीच खाता, आता टोमॅटोचं सुपरटेस्टी लोणचं करून पाहा...

टोमॅटोचं लोणचं पौष्टिक तर असतंच, पण जेवणाची रंगतही वाढवतं. कधी भाजी नसल्यास हे लोणचं आणि पोळी एकदम मस्त आहे... 

त्यासाठी सगळ्यात आधी तर अर्धा किलो टोमॅटो स्वच्छ धुवून कोरडे करून घ्या आणि नंतर चिरून घ्या.

त्यानंतर बडिशेप, मेथ्या, मोहरी आणि जिरे तव्यावर मंद आचेवर भाजून घ्या आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून त्यांचा मसाला करा.

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल घालून हळद घाला. चिरलेले टोमॅटो परतून घ्या आणि त्यात चवीनुसार मीठ घाला.

टोमॅटो मऊ झाले की त्यात तयार केलेला मसाला, लाल तिखट आणि गूळ घाला. टोमॅटोचं लोणचं तयार. हे लोणचं फ्रिजमध्येच ठेवावं. 

Click Here