तुमचं प्रमोशन पगारवाढ रोखणाऱ्या ६ गोष्टी

या सवयींमुळे कार्यक्षमता कमी होतो. वेळीच बदलणे गरजेचे नाहीतर कामातला रस कमी होतो. 

आपल्या काही सवयी आपल्या गुणवत्तेवर , कार्यक्षमतेवर आणि कौशल्यांवर परिणाम करतात. त्या सवयी वेळीच बंद करणे फार गरजेचे असते. 

एकाच वेळी अनेक कामं करण्याची सवय अनेकांना असते. मात्र त्यामुळे एका कामाकडे लक्ष देता येत नाही आणि चांगले काम होत नाही. 

सतत मोबाइल पाहण्याची सवय फार वाईट आहे. दर दोन मिनिटांनी नोटीफीकेशन पाहायची सवय असेल तर आत्ताच ती बदला. 

कामाची टाळाटाळ तसेच पळवाटा शोधण्याची सवय कार्यक्षमतेवर परिणाम करते. विचारक्षमता कमी होते. त्यामुळे काम वेळेवरच करा. 

झोपेचा अभाव असेल तर कोणतेही काम चांगले होत नाही. रात्री योग्य वेळी झोपणे आणि शरीराला गरजेची असलेली झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे. 

काही जणं काम पटापट संपवायचं म्हणून कामाच्या मधे ब्रेक घेत नाहीत. त्यामुळे काम लवकर तर होते मात्र त्याचा दर्जा कमी होतो. बुद्धीला आराम द्यायलाच हवा. 

आहार, व्यायाम, दिनचर्या याचा परिणाम गुणवत्तेवर होतोच. त्यामुळे दिनचर्या चांगलीच असायला हवी. 

Click Here