झणझणीत मराठी पदार्थांच्या प्रेमात असलेल्या ६ अभिनेत्री!

मराठी पदार्थ आहारात घ्यायला आवडते. नक्कीच खातो असे सांगणाऱ्या पाहा कोण आहेत. 

मराठी पदार्थ जगभरातून आवडीने खाल्ले जातात. अनेक बॉलिवूड सुपरस्टार मराठी पदार्थांचे कौतुक करताना कायम दिसतात. 

काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांना पारंपरिक मराठी पदार्थ फार आवडतात. कितीही डाएट केले तरी मराठी पदार्थ आहारात असतातच. 

श्रद्धा कपूर पूर्णपणे मराठी मुलगीच आहे. श्रद्धाला सगळ्यात जास्त काही खायला आवडत असेल तर तो पदार्थ म्हणजे वरण भात. तिची आई मराठी असल्याने ती कायम मराठी पदार्थांनाच प्राधान्य देते. 

विद्या बालन मुंबईत अनेक वर्षे राहिली तिला साबुदाणा वडा फार आवडतो. तसेच इतरही पदार्थ ती आवडीने खाते. 

काजोलच्या आईचे माहेर हे मराठीच. त्यामुळे ती लहानपणापासून बटाटा वडा आणि थालीपीठ खात मोठी झाली आहे. 

राणी मुखर्जीला मिसळ पाव आणि साबुदाणा खिचडी फार आवडते असे तिने मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 

जान्हवी कपूर पंजाबी पदार्थ जास्त खाते तरी तिला झणझणीत मिरचीचा ठेचा फार आवडतो. 

कंगनाला डाएट वगैरे करायला आवडत नाही आणि ती आवडीने वडापाव खाते असे तिने सांगितले. 

Click Here