रोज खा ५ पदार्थ, पोट होईल साफ....

 ५ चविष्ट आणि पौौष्टिक पदार्थ .आहारात असतील तर पोट साफ राहते.

पोट साफ होत नसेल किंवा त्रास होत असेल तर आहारात या ५ पदार्थांचा समावेश करा. या पदार्थांचे प्रमाण वाढवा. पोटाला नक्की आराम मिळेल. 

जिरं हे पचनासाठी खूप उपयोगी मानले जाते. जिऱ्याचे पाणी किंवा भाजलेले जिरे खाल्ल्याने अपचन, गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास कमी होण्यास मदत होते.

हिंग हा स्वयंपाकातील महत्त्वाचा पदार्थ आहे. हिंगामुळे पचन सुधारण्यास मदत होते आणि गॅसचा त्रास कमी होतो. 

अंजीर मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हे फळ आहारात नक्की असावे. तसेच सुकामेवाही चांगलाच ठरतो. 

पपई हे पोटासाठी अतिशय हलके आणि फायदेशीर फळ मानले जाते. पपईमध्ये असलेले फायबर आणि नैसर्गिक एन्झाइम्स पचन सुधारण्यास मदत करतात.

काळ्या मनुका रात्री भिजत ठेवायच्या आणि सकाळी खायच्या. पचनासाठी उत्तम असतात. 

Click Here