जगातली सगळ्यात महागडी नेलपेंट काेणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
मॅट नेलपेंट, ग्लॉसी नेलपेंट असे नेलपेंटचे कित्येक प्रकार आहेत. पण ही नेलपेंट या सगळ्या प्रकारांपेक्षा खूप वेगळी आहे.
कारण ही नेलपेंट चक्क ब्लॅक डायमंड क्रश करून त्यापासून तयार करण्यात येते.
लॉस एंजेलिस इथल्या ब्लॅक डायमंड किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अझेचर पोगोसियन या ज्वेलर्सने ही नेलपेंट तयार केली आहे.
त्यामुळे अझेचर या नावानेच ही नेलपेंट ओळखली जाते.
जगभरातल्या अतिश्रीमंत व्यक्तींनाच ती परवडू शकते. कारण ही नेलपेंट घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात.