रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी काही पदार्थ नियमितपणे खाणे गरजेचे आहे. जेणेकरून आजारपण आपल्यापासून दूर राहील.
त्यापैकी पहिला पदार्थ आहे आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
फ्लेवोनाईड्स, व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असणारं सफरचंदही रोज खायला हवं.
बदाममध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, प्रोटीन्स, व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी रोज बदाम खायला हवे.
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यांचा उत्तम स्त्रोत म्हणजे पपई. पपईमध्ये पचनासाठी उपयुक्त ठरणारे एन्झाईम्सही भरपूर प्रमाणात असतात.
लसूणही रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो.
लोह, फोलेट, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात देणारं बीटरुटही राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करतं.