हिवाळ्यात त्याच त्या प्रकारचे स्वेटर घालून कंटाळा आला असेल तर हे काही स्टायलिश स्वेटर ट्राय करा.
कार्डीगन डिझाईनमध्ये असे अनेक प्रकार सध्या अगदी खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळत आहेत.
ओव्हर साईझ स्वेटर घालण्याचा सध्या जबरदस्त ट्रेंड आहे. जीन्सवर हे स्वेटर खूप स्टायलिश लूक देतात.
हाय नेक स्वेटरही दिसायला आकर्षक आणि थंडीपासून पुरेपूर संरक्षण करणारे ठरतात.
कार्डिगन प्रकारात अशा पद्धतीचे एकापेक्षा एक सुंदर स्वेटर्स अगदी रास्त दरात मिळतात.
हल्ली प्रिंटेड स्वेटरचाही खूप ट्रेंड आहे. असं एखादं स्वेटर आपल्या कलेक्शन मध्ये हवंच.
क्रॉप टॉपप्रमाणे क्रॉप स्वेटर किंवा क्रॉप स्वेट शर्टही सध्या ट्रेंडिंग आहेत.
अशा पद्धतीचे शॉर्ट असणारे आणि एम्ब्रॉयडरी केलेले स्वेटरही तुम्ही घेऊ शकता. फॅशनेबल लुक मिळेल.