उकडलेले शेंगदाणे कधी खाल्ले का? चवीला एकदम मस्त आणि शरीराला बाधत नाहीत. रेसिपी पाहा.
खारे शेंगदाणे एकदा का खायला सुरवात केली की हातावर आणि तोंडावर अजिबात संयम राहत नाही.
मात्र असे खारेदाणे किंवा साधे शेंगदाणे जास्त खाल्याने पित्त वाढते. त्यामुळे मग पोटात दुखते किंवा उलट्या होतात.
हेच शेंगदाणे वाफवल्यावर शरीराला कमी बाधतात. तसेच चवीला एकदम मस्त लागतात.
शेंगदाणे पाण्यात किमान तासभरासाठी भिजवायचे. साल्यांसकट घ्यायचे. सालं काढू नका. अजिबात नडत नाहीत.
शेंगदाणे जरा मऊ झाले की त्यात मीठ घालायचे आणि कुकरला लावायचे.
नेहमीपेक्षा दोन शिट्या जास्त काढायच्या. त्यामुळे दाणे छान शिजतात. त्यात मीठ मात्र भरपूर घालायचे.
नंतर पाणी काढून टाकायचे आणि मग गरमागरम दाणे खायला घ्यायचे. नक्की करुन पाहा. चवीला एकदम भारी लागतात.