प्रसादासाठी एकदम मस्त पर्याय म्हमजे लाडू. विविध प्रकारचे करता येतात. आणि चवीलाही छान.
प्रसादासाठी काही द्यायचे असेल तर लाडू करणे कधीही सोयीचे ठरते. करायला सोपे असतात आणि टिकतातही बरेच दिवस. लाडूंचे प्रकार पाहा.
गूळ-दाण्याचा लाडू करायला अगदी सोपा असतो. तसेच चवीला मस्त असतो. झटपट करु शकता.
नारळाचे लाडू गणपतीत नक्की करा. मऊसर असे हे लाडू चवीला एकदम भारी असतात.
बेसनाचा लाडू तर सगळ्यांच्या आवडीचा आहे. लहान-मोठे असे बेसन लाडू फार मागणीत असतात. घरी करायला अगदीच सोपे.
सुकामेवा लाडू एकदम झटपट रेसिपी आहे. बदाम, काजू, इतर मेवा वापरुन नक्की करा.
बुंदीचा लाडू तर अगदी लोकप्रिय असा पदार्थ आहे. मऊ, कडक दोन्ही प्रकारचे घरी करणे अगदी सोपे आहे.
मिश्र डाळींचे लाडू करता येतात. ते चवीला छान असतातच आणि पौष्टिकही असतात नक्की करुन पाहा.