उन्हाळा सुसह्य आणि चवदार करायचा असेल तर हे काही पदार्थ रोजच्यारोज प्यायलाच हवे...
उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ नये म्हणून हे काही पदार्थ आपल्या आहारात असायलाच हवेत..
पहिला पदार्थ आहे उन्हाळ्याची खासियत म्हणजेच गारेगार पन्हं...
गुलकंद शरीर थंड ठेवतं. त्यामुळे गुलकंद शेक तर या दिवसांत प्यायलाच पाहिजे.
गारेगार ताकाची मजाच वेगळी. ताज्या दह्याचं ताजं ताक उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करतं.
या दिवसांत नारळपाणीही प्या. कारण शरीर डिहायड्रेट होत नाही.
सब्जा हा देखील थंड असतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात सब्जा घातलेलं पाणी पिऊन केल्यास अधिक उत्तम.