आरोग्यासाठी भिजवलेला सुकामेवा ठरेल फार पौष्टिक. पाहा कसा खावा.
आरोग्यासाठी सुकामेवा कायमच फायदेशीर असतो. मुळात चवीलाही छान गोड असल्याने लहान मुलेही आवडीने खातात. सगळ्या प्रकारचा सुकामेवा खावा.
सुकामेवा नुसता खाता येतो, पदार्थांत घालता येतो. इतरही काही प्रकारे खाल्ला जातो. तसेच सुकामेवा काही तासांसाठी पाण्यात भिजवायचा आणि मग खायचा. त्यामुळे आरोग्याला कमालीचे फायदे मिळतात.
सुकामेवा जसे की काजू, मनुका यांमध्ये फॅटीक अॅसिड असते. ते शरीराला लोह, झिंक, कॅल्शियम अशी सत्वे देते.
ही सत्वे सुकामेवा जर भिजवलेला असेल तर जास्त लवकर शोषली जातात. त्याचा आरोग्याला फायदाही जास्त होतो.
सुकामेवा भिजवल्यामुळे त्यातील जीवनसत्वे, एन्झाइम्स आणि प्रोटीन अधिक सक्रिय होतात.
तसेच सुकामेवा भिजवल्यावर जास्त चविष्ट लागतो असे अनेकांचे म्हणणे आहे. चवीसाठी सगळे आवडीने खातात.
मनुका, खारीक, खास म्हणजे बदाम भिजवायचे आणि मग खायचे. भिजवलेल्या मनुका पचनासाठी फार फायद्याच्या असतात.
रात्रभर भिजवलेले बदाम बुद्धीसाठी फार फायद्याचे असतात. त्यामुळे लहान मुलांना रोज दोन बदाम खायला द्या.