मुठभर भिजवलेले काळे चणे म्हणजे पोषण 

थोडे काळे चणे खाणे ठरेल आरोग्यासाठी फार पौष्टिक .पाहा कसे खावे. 

काळे चणे ज्याला हरभरा असेही म्हटले जाते. ते आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. त्यात अनेक पोषक तत्त्वे असतात. काळ्या चण्याची भेळ करुन खाणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते आणि चविष्टही. 

भिजवलेले काळे चणे भरपूर प्रथिनांनी भरलेले असते. शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होतात. 

पचन सुधारण्यासाठी तसेच पोट जास्त वेळ भरलेले ठेवण्यासाठी हे चणे उत्तम पर्याय आहेत. त्यात भरपूर फायबर असते. 

त्यात कोलेस्ट्रॉल कमी असते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जर डाएट करत असाल तर त्यात भिजवलेले काळे चणे नक्की असावेत. 

शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणारे कार्बोडायड्रेट्स या पदार्थात असतात. त्यामुळे ऊर्जाही मिळते.

या चण्यांमध्ये मॅग्नेशियम , पोटॅशियम आणि फॉस्फरस असते. तसेच फॉलिक अॅसिड असते आणि लोहही असते. 

मात्र भरपूर तेल आणि मसाले घातलेली काळ्या चण्याची उसळ खाण्याऐवजी त्याची साधी भेळ करणे जास्त आरोग्यदायी ठरते. 

कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर असे पदार्थ घालून वाफवलेली भेळ तयार करायची. चवीलाही मस्त लागते. 

Click Here