बेडरुमचा मेकओव्हर करण्यासाठी स्वस्तात मस्त ट्रिक्स...

कमीतकमी खर्चात बेडरुमला क्लासी, रिच लूक देण्यासाठी या बघा काही आयडिया..

बेडरुममध्ये छान फ्रेश रंगाचे पडदे लावा. हल्ली प्रिंटेड प्रकारात खूप वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात.

पडद्यांप्रमाणेच बेडशीट, पिलो कव्हर हे देखील फिकट पण फ्रेश रंगाचे निवडा. खूप भडक रंग टाळा...

हल्ली कपड्यांसाठी खूप वेगवेगळे ऑर्गनायझर मिळतात. ते वापरायला लागा. यामुळे बेडरुममधला कपड्यांचा पसारा बराच कमी होतो. 

बेडरुममधल्या कोपऱ्यांमध्ये किंवा बेडच्या बाजुला खरीखुरी रोपं ठेवा. यामुळे बेडरुमचा लूक बदलून ती जास्त फ्रेश वाटेल.

बेडच्यावर असं एखादं छानसं पेंटिंग लावा. यामुळे तुमची रूम जास्त क्लासी दिसेल. 

जमिनीवर छानशी मॅट घालून ठेवा. तसेच अशा वेगवेगळ्या गोष्टी आणून बेडरुम सजवा. तुमची जुनीच बेडरुम अगदी नवी वाटू लागेल. 

Click Here