.. तर तुम्ही दही खाणं फार धोक्याचं!

दही खाणे आरोग्यासाठी ठरेल वाईट. पाहा कोणी दही खाणं टाळायला हवं. 

 सर्दी झाल्यावर ताक, दही असे पदार्थ खाऊ नयेत. घरचे नेहमीच सांगतात. तसेच थंडीतही दही कमी खावे. खरंच दही खाणे टाळावे का ?

दही शरीरासाठी फार चांगले असते, मात्र सर्दी झाल्यावर किंवा थंड हवामान असताना दही खाणे टाळायला हवे त्याची काही कारणे आहेत. 

दही थंड असते. तसेच दही कफ वाढवते. त्यामुळे सर्दी बरी होण्यात अडथळा येतो. 

दही खाल्यावर किंवा ताक प्यायल्यावर नाक बंद झाल्यासारखे जाणवते. कारण मुळातच वातावरण थंड असेल तर दह्याचा परिणाम शरीरावर उलटा होतो. 

खोकला झाला असेल तर त्याची तीव्रता वाढते. खोकला झाला नसेल तर दह्यामुळे नक्कीच होईल. 

थंडीत जर गारवा जाणवत आहे पण त्रास काही होत नाही तरीही दही खाणे टाळायला हवे. कारण त्यामुळे नसलेले आजारपण ओढवून घेतले जाते. 

उन्हाळ्यात दही भरपूर खा. मात्र इतर वेळी दही खाताना वेळ आणि शरीराची स्थिती जाणून घेणे फार गरजेचे असते. 

Click Here