राजस्थानी पद्धतीने करा कैरीचं चटपटीत लोणचं...

कैरीचं लोणचं करण्याची ही खास राजस्थानी रेसिपी एकदा ट्राय करून पाहा...

या पद्धतीने लोणचं करणं अगदी सोपं आहे. शिवाय खूप कमी तेलात ते होतं.

त्यासाठी सगळ्यात आधी १ किलो कैऱ्या फोडून, स्वच्छ धुवून घ्या. आणि सुती कपड्याने पुसून पुर्णपणे कोरड्या करून घ्या.

त्यानंतर ५० ग्रॅम बडिशेप, ५० ग्रॅम मेथ्या, २ चमचे कलौंजी, हळद, थोडंसं हिंग आणि ४ चमचे तिखट आणि चवीनुसार मीठ लागणार आहेे.

सगळ्यात आधी कैऱ्यांना मीठ आणि हळद लावून त्या ४ ते ५ तास तशाच ठेवा.. त्यानंतर बडिशेप, मेथ्या भाजून घ्या आणि त्यांची पावडर करून घ्या.

आता बडिशेप, मेथ्या मिक्सरमधून बारीक फिरवून घ्या. तेल तापवून घ्या. त्यात हिंग, हळद घालून तेल थंड होऊ द्या.

कैरीच्या फोडींमध्ये तयार केलेला मसाला, तेल हळूहळू करत घाला. सगळ्या फोडींना व्यवस्थित मसाला लावा. तयार झालेलं लोणचं स्वच्छ, कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवा. वर्षभर लोणचं चांगलं टिकतं.

Click Here