आई तुझ्यामुळेच..! चॅम्पिअन बुद्धिबळपट्टूंच्या साध्याभोळ्या मातोश्री

आईच्या मदतीशिवाय काहीच नसतं झालं. आई पाठीशी होती म्हणूनच....

मुलांच्या यशामागे कायमच एक खंबीर आई असते. भारतीय बुद्धिबळ खेळाडूंसोबत कायम त्यांची आई दिसते. साधीशी बाई, पण तिने चॅम्पिअन घडवण्याची कमाल केली.

FIDE World Cup जिंकल्यानंतर दिव्या देशमुख आईला मिठी मारुन किती वेळ रडली. तिच्या आईनं आपली डॉक्टरकीची प्रॅक्टिस लेकीसाठी सोडून दिली.

ग्रॅण्डमास्टर कोनेरु हम्पी तर स्वत: लहान लेकीची आई. आणि तिच्यामागे कायम उभी राहिली आजवर तिची आईच.

प्रज्ञानंद आणि वैशाली रमेशबाबू एक आदर्श बहिण-भाऊ आहेत. त्यांची आई नागलक्ष्मी. साधी गृहिणी पण मुलांसाठी तिनं जीवाचं रान केलं.

गुकेश फार लोकप्रिय आहे. त्याची आई पद्माकुमारी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. गुकेशच्या आईने कायमच त्याला प्रोत्साहन दिले.

अनेकांचा आदर्श असलेले विश्वनाथन आनंद त्यांच्या आईकडूनच बुद्धिबळ शिकले. आईने त्यांना मार्गदर्शन केले.

अर्जुन एरिगाईसी भारतातील एक नावाजलेला खेळाडू आहे. त्याची आई ज्योती एक वर्कींग महिला असून मुलाला यशस्वी पाहण्यासाठी प्रचंड कष्ट घेते.

Click Here