आरोग्यासाठी प्रक्रिया केलेले पदार्थ ठरतील फारच धोक्याचे. पाहा काय खाणे टाळाल.
विकतचे उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळायला हवे. त्याच प्रमाणे प्रोसेस्ड पदार्थ वापरणे आरोग्यासाठी चांगले नाहीत.
प्रक्रिया करुन नंतर बंद करुन विकले जाणारे पदार्थ बराच काळ टिकतात मात्र त्यांची गुणवत्ता तेवढीच कमी झालेली असते.
अगदी भाज्यासुद्धा त्यावर प्रक्रिया करुन साठवल्या जातात. भाजी कितीही पौष्टिक असली तरी ती प्रक्रिया केल्यावर आरोग्यासाठी चांगली राहत नाही.
असे प्रक्रिया केलेले अन्न वजन झपाट्याने वाढवतात. त्यामुळे पचनाची क्रिया मंदावते आणि इतरही शारीरिक त्रास होतात.
ओबेसिटी, मधुमेह, हृदयाचे विकार आदी त्रासांचे कारण हे पदार्थ ठरतात. लहान ते जीवघेणे सारे त्रास यांमुळे उद्भवतात.
या पदार्थांत काही रसायने आणि साखर असते ज्यामुळे ते एकदा खाल्ले की परत खावे वाटतात. जिभेला त्याची चटक लागते.
असे अन्न आतड्यांना चिकटते. पचत नाही आणि आतड्यांचे आरोग्यही बिघडवते. त्यामुळे पचनाचे अनेक विकार होतात.
योग्य पोषण शरीराला मिळाले नाही की अर्थातच त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही होतो.