रात्रीच्या जेवणानंतर ४ कामं करा, वजन वाढणारच नाही

रात्रीच्या जेवणानंतर काही गोष्टी आवर्जून केल्यास वजन नियंत्रित राहण्यात नक्कीच मदत होऊ शकते.

पोटाचा घेर वाढतच चालला असेल तर पुढे सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करा. यामुळे मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि त्यामुळे शरीरावर चरबी साचून राहात नाही.

जेवल्यानंतर तासाभराने हर्बल टी, ग्रीन टी प्यायल्याने पचन, मेटाबॉलिझम चांगले होते आणि शुगर क्रेव्हिंग कमी होते.

जेवण केल्या केल्या लगेच झोपू नका. पण रात्री ७ ते ८ तासांची शांत झोप होईल याची काळजी घ्या..

रात्री जंकफूड, प्रोसेस्ड फूड खाणं टाळा. त्याऐवजी काहीतरी हेल्दी, घरी तयार केलेलं सकस अन्न खा.

Click Here