घरगुती एनर्जी ड्रिंक, 'असे' करा लिंबूपाणी 

हे असे तयार केलेले लिंबूपाणी उन्हाळ्यात गरजेचे. फक्त तीन पदार्थ वापरा. 

उन्हाळ्यात शरीर पटकन थकते, घामामुळे पाणी आणि मीठाची कमतरता निर्माण होते. अशा वेळी लिंबू पाणी शरीरासाठी अतिशय उपयोगी ठरते.

लिंबामध्ये भरपूर व्हिटामिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. उन्हामुळे येणारा थकवा, अशक्तपणा कमी करण्यास लिंबू पाणी मदत करते.

सब्जा बिया उन्हाळ्यात विशेषतः फायदेशीर असतात. पाण्यात भिजवल्यावर या बिया फुगतात आणि शरीराला थंडावा देतात. त्या पचन सुधारतात, अॅसिडिटी कमी करतात आणि पोट शांत ठेवतात. 

सैंधव मीठ (रॉक सॉल्ट) शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करते. घामामुळे शरीरातून जे मीठ बाहेर पडते, ते भरून काढण्याचे काम सैंधव मीठ करते. 

हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर तयार होणारे पेय म्हणजे एक प्रकारचे नैसर्गिक एनर्जी ड्रिंकच आहे. हे पेय शरीराला लगेच ताजेतवाने करते, 

चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा यांसारख्या समस्या कमी करते. याशिवाय, हे पेय पचनासाठीही चांगले असते.

Click Here