बरेच लोक दिवसाची सुरुवात लिंबू पाणी पिऊन करतात. पण ते सगळ्यांसाठीच फायदेशीर नाही.
ज्या लोकांना नेहमीच ॲसिडीटी होणे, छातीत जळजळणे असा त्रास होतो, त्यांनी रिकाम्यापोटी लिंबूपाणी पिऊ नये.
ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असतो. त्या लोकांनाही रिकाम्यापोटी लिंबूपाणी प्यायल्यास त्रास होऊ शकतो.
थंड, गरम खाल्ल्यानंतर ज्या लोकांचे दात ठणकतात त्यांनीही लिंबूपाणी पिणं टाळायला हवं.
मळमळ होणे, अपचन होणे असा त्रास नेहमीच होत असेल तर रिकाम्यापोटी लिंबूपाणी प्यायल्याने हा त्रास वाढू शकतो.