नारळपाणी पिणं आरोग्यदायी मानलं जातं. पण ते प्रत्येकासाठीच तेवढं फायदेशीर ठरत नाही.
काही काही आजार किंवा शारिरीक त्रास असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पिणं टाळायला हवं असं ऋजुता दिवेकर सांगतात.
कारण अशा लोकांना त्यांच्या तब्येतीमुळे नारळपाणी पिऊन फायदे होण्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं.
नारळाच्या पाण्यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ज्यांना किडनीचा त्रास असतो अशा लोकांनी नारळपाणी पिणं टाळायला हवं.
ब्लड प्रेशर म्हणजेच बीपीचा त्रास ज्यांना असतो त्यांनीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच नारळपाणी प्यावं. कारण त्यामुळे बीपी लो होऊ शकतं.
नारळपाण्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी ते पिण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.