राखीपौर्णिमेनिमित्त तुमच्या बहिणीला तुम्ही पैंजन गिफ्ट करू शकता. बघा लेटेस्ट फॅशनचे सुंदर पैंजन डिझाईन्स..
नाजुक मीनाकाम असणारं हे पैंजन पायात अगदी ठसठशीत दिसेल.
फुलं आणि त्याला बारीक साखळ्या अशा पद्धतीचं हे डिझाईन अगदी नव्या पद्धतीचं आहे.
मोत्याचे पैंजन अगदी वेगळे वाटतात. त्यामुळे बहिणीला हे युनिक डिझाईन नक्की आवडेल.
सणसमारंभांना घालायला अशा पद्धतीचे जाडसर पैंजन छान वाटतात.
ही फुलं एवढी नाजुक आणि सुंदर आहेत की बघताक्षणीच कोणालाही आवडतील.
अशा पद्धतीचे पैंजन भेट म्हणून दिले तर राखीपौर्णिमेच्या दिवशी तुमची बहिण नक्कीच खुश होऊन जाईल.
हा एक नवा, सुंदर प्रकार पाहा. रोजच्या वापरासाठीही ते अगदी छान वाटतात.