रागारागात गपागप खाणं पडू शकतं महागात...

रागाच्या भरात तुम्हीही तावातावात काही खात असाल तर त्याचा बघा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो.. 

आहारतज्ज्ञ डिंपल जांगडा सांगतात की ज्यांना खूप राग येतो अशा व्यक्तींना लिव्हरचा आजार होण्याचा धोका खूप जास्त असतो.

जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा शरीरातलं पित्त खूप वाढतं आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या पचनावर होतो.

अशा परिस्थितीत जर आपण कितीही पौष्टिक पदार्थ खाल्ले तरी ते आपल्याला अजिबात पचत नाहीत, अंगी लागत नाहीत.

म्हणूनच आपल्याकडे असं म्हटलं जातं की राग आल्यानंतर एखादा ग्लास पाणी प्या, शांत व्हा आणि मग पुढची कामं करा.

कारण पाणी प्यायल्याने शरीराचं वाढलेलं तापमान आणि ॲसिडची वाढलेली पातळी दोन्हीही कमी होण्यास मदत होते.

Click Here