रिकाम्यापोटी सकाळी-सकाळी अजिबात खाऊ नका ५ पदार्थ .... 

सकाळी खाऊ नका हे काही पदार्थ. आरोग्यासाठी ठरतात वाईट. 

सकाळी झोपून उठल्यावर उपाशीपोटी काय खावे यासाठी काही नियम असतात. जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. 

सकाळी मसालेदार , तेलकट भरपूर तेल असलेले पदार्थ खाऊ नका. त्यामुळे पचनावर ताण येतो. 

उपाशीपोटी चहा-कॉफी पिता? त्यामुळेच ऍसिडिटीचा त्रास होतो. काही अन्न पोटात गेल्याशिवाय ही पेयं पिऊ नका. 

झणझणीत , तिखट पदार्थ रिकाम्यापोटी नाश्त्याला खाणे टाळा. आरोग्यासाठी ही सवय चांगली नाही. 

फळे तर आरोग्यासाठी चांगलीच असतात मात्र सकाळी रिकाम्यापोटी अॅसिडयुक्त फळे खाऊ नका. संत्र, मोसंब खाणं टाळा. 

नाश्त्याला प्रचंड साखर घातलेले पदार्थ खाऊ नका. पहिलाच घास गोडाचा असेल तर जि‍भेवर ताबा राहत नाही. सकाळी पहिले काहीतरी साधं पौष्टिक खाणंच योग्य.

Click Here