गणेश उत्सवाची सगळीकडे जोरदार सुरुवात झाली आहे.
गणपतीच्या नैवेद्यासाठी मोदकांचा पहिला मान असतो. त्यामुळे पहिल्या दिवशी मोदक केल्यानंतर आता पुढे १० दिवस कोणता नैवेद्य करायचा हा प्रश्न पडतोच..
त्यासाठीच हे काही गोड पदार्थ पाहा. त्यांचा नैवेद्य तुम्ही गणेशोत्सवात बाप्पासाठी नक्कीच करू शकता.
पहिला पदार्थ म्हणजे शिरा. रव्याचा शीरा करायलाही सोपा आहे आणि त्यासाठी खूप वेगळी मेहनत घेण्याची गरजही नाही.
सुकामेव्याचे लाडू किंवा मोदकही तुम्ही गणपतीसाठी करू शकता.
मखाना आणि सुकामेवा घातलेले लाडू हा पदार्थही नैवेद्यासाठी उत्तम आहे. शिवाय खूप पौष्टिकही आहेच.
बेसनाचे लाडू अनेकांना आवडतात. त्यामुळे त्याचा विचारही तुम्ही नैवेद्यासाठी नक्कीच करू शकता.
ओट्स आणि नारळ घालून केलेले लाडू किंवा मोदक हा पदार्थही करायला सोपा आणि झटपट होणारा आहे.