भारतीय लोकांना तसं गोड खूप आवडतंच, पण त्यातही कोणते गोड पदार्थ आपल्याकडे सर्वाधिक खाल्ले जातात ते पाहा..
बेसनाचे लाडू हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. महाराष्ट्रात तर दिवाळी, दसरा असो किंवा घरात कोणतंही कार्य असो, बेसन लाडू केलेच जातात.
फालुदा हा देखील बहुतांश लोकांच्या आवडीचा. शेवयाची खीर, आईस्क्रिम, सुकामेवा यांचं मिश्रण असणारा फालुदा उन्हाळ्यातला एक सगळ्यांचा आवडीचा पदार्थ.
करंजी देखील अनेकांना आवडते. प्रांतानुसार ती करण्याची पद्धत वेगवेगळी असते. कोणी खव्याची, कोणी सुकामेव्याची तर कोणी नारळाची किंवा खोबऱ्याची करंजी करतात.
साखरेच्या पाकात मस्त मुरलेले गुलाबजाम हा देखील बहुसंख्य लोकांचा आवडीचा पदार्थ. त्यात आता तर गुलाबजाम आईस्क्रिम एकत्र करून खाण्याच्या पद्धतीमुळे तर त्याची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
गरमागरम जिलेबी पाहिलं की बहुतांश भारतीयांच्या तोंडाला हमखास पाणी सुटतंच..
या गोड पदार्थांच्या यादीत रसगुल्ल्याला विसरून चालणार नाही. कारण तो मुळचा बंगालचा असला तरी त्याचे चाहते भारतभर आहेत.