'ही' आहेत जगातली सगळ्यात महागडी फळं...

या फळांची यादी पाहा आणि यापैकी तुम्ही कोणकोणती फळं खाल्ली आहेत ते सांगा..

चौकोनी आकाराचं टरबूज अतिशय महाग असून त्याची किंमत ८० हजार ते २ लाखांपर्यंत असते. त्याच्या आकारानुसार त्याची किंमत ठरते.

सेम्बिकिया क्वीन स्ट्रॉबेरी हे फळ घ्यायचं असेल तर त्या अर्धा डझन फळांची किंमत १४ ते १५ हजार असते.

डेन्सूक प्रजातीचं टरबूजही साधारण एखाद्या लाखापर्यंत विकलं जातं. 

सेकाई इची सेब हे जपानमधलं फळही बरंच महाग असतं. जवळपास दिड हजाराला १ फळं मिळतं.

युबारी खरबूज हे जपानमध्ये पिकवलं जाणारं फळ तर अतिशय महाग असून त्याची किंमत तब्बल २० लाख रुपये एवढी आहे.

या आंब्याला म्हणतात एग ऑफ दि सन. हा आंबाही जपानमध्ये पिकवला जातो आणि लिलाव करून त्याची विक्री होते. आतापर्यंत या फळासाठी मोजली गेलेली सर्वाधिक किंमत म्हणजे ३ लाख.

द्राक्षांचा प्रकार असणारे रुबी रोमन ग्रेप्सही महागड्या फळांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

Click Here