उत्साहात जल्लोषात ढोल वाजवणाऱ्या मराठी अभिनेत्री   

अभिनय क्षेत्राप्रमाणेच वादन क्षेत्रातही योगदान देणाऱ्या मराठी तारका. 

गणपती बाप्पाचे आगमन होणार म्हणजे महाराष्ट्राच्या रस्त्यांवर ढोल ताशाचा स्वर गुंजणार. या पथकांमध्ये नारीशक्तीचा ही समावेश असतो. 

मराठी चित्रपटात सुंदर भूमिका साकारणार्‍या काही सौंदर्यवती तेवढ्याच जल्लोषात ढोल वाजवतानाही दिसतात. 

श्रुती मराठे मराठीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. गेली अनेक वर्षे ती कलावंत पथकाचा भाग आहे. 

मराठी मालिकांमध्ये दिसणारी अनुजा साठे पुण्यातील विविध मिरवणुकींमध्ये कायम सहभाग घेते. 

तेजस्विनी पंडित एक प्रसिद्ध ढोल वादक आहे. कायम उत्साहात वादनाचा आनंद घेताना दिसते. 

मधुरा देशपांडेही या पथकाचा भाग आहे. आवडीने वाद्य वाजवते. 

नुपूर दैठणकर ही गेली अनेक वर्षे ढोल पथकाचा भाग आहे. मराठी मालिकांमधील तिच्या भूमिका फार लोकप्रिय आहेत.   

मीरा सारंग सध्या मराठी मालिकेतील उभरते नाव आहे. मीराही एक ढोल वादक आहे. 

Click Here