टोमॅटोचे ६ चमचमीत पदार्थ 

एकदा नक्की करुन पाहा टोमॅटोच्या या चमचमीत रेसिपी. करायला सोप्या आणि चव जबरदस्त. 

टोमॅटो हा आपल्या आहारातला एक सामान्य पदार्थ आहे. अगदी रोज नाही पण वरचेवर टोमॅटोचा वापर आपण करत असतो.

टोमॅटो फक्त साईड पदार्थ म्हणून वापर असाल तर पाहा किती मस्त चवींना मुकत आहात. टोमॅटोचे मस्त चविष्ट पदार्थ करता येतात. 

टोमॅटो सूप तर सगळ्यांना माहिती आहे. एकदम मस्त लागते. पावसाळ्यात तर नक्कीच प्यायला हवे. गरमागरम सूप आणि पाऊस आहाहाहा !!

टोमॅटो आमलेट हा पदार्थ नाश्त्यासाठी एकदम मस्त आहे. करायला फार सोपा आहे आणि चवीला एकदम भारी. 

टोमॅटो सार हा आपला अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ आहे. अगदी कमी साहित्यात करता येते आणि एकदम मस्त होते. 

टोमॅटो चटणी हा भाजीऐवजी करता येणारा एक मस्त पदार्थ आहे. इतर पदार्थ आवडीनुसार घ्या. मस्त परतून केली की आणखी मस्त लागते. 

टोमॅटो भात हा झटपट होणारा आणि पोटभरीचा असा पदार्थ आहे. त्याला लसणाची चमचमीत फोडणी दिल्यावर चव आणखी मस्त लागते. 

टोमॅटो रस्सम कधी खाल्ले का ? पातळ असते मात्र चवीला एकदम भन्नाट. तिखट आवडत असेल तर नक्कीच खा. रस्सम भात म्हणजे सुख आहे. 

Click Here