उरलेल्या भाजीचे करा मस्त चमचमीत पदार्थ. विचारही केला नसेल असे पदार्थ करता येतात.
रात्रीची उरलेली भाजी सकाळी फेकून द्यायची वेळ येते. कारण तीच भाजी खायला कोणी तयार होत नाही.
अशा वेळी त्या भाजीचे झटपट ५ पदार्थ करता येतात. कोणती भाजी आहे त्यावरुन कोणता पदार्थ करायचा हे ठरवा.
फ्लावर, मटार, बटाटा, सोयाबिन, पनीर यासारख्या भाज्यांचा मस्त पुलावासारखा भात करता येतो. फोडणीत भाजी घालायची आणि वरतून भात घालायचा.
कोणत्याही भाजीचा रोल, फ्रॉन्की करणे एकदम सोपे आहे. कांदा, टोमॅटो वेगवेगळे सॉस चीज असे पदार्थ घालून रोल करता येतो. तव्यावर छान फ्राय करायचा.
कोबी, बटाटा सारख्या इतरही भाज्या जरा कुसकरुन घ्यायच्या. त्यात बेसन घालून मस्त तळून काढायच्या. अशी भजी छान कुरकुरीत होते.
कोणत्याही सुक्या भाजीचे धिरडे करणे एकदम सोपे आहे. त्यात तांदळाचे पीठ आणि बेसन घालायचे. मस्त भिजवायचे. त्यात मसाले घालायचे. मस्त धिरडं लावायचं.
भाजीचा लगदा करायचा. त्यात मसाले मीठ, बीट, गाजर घालायचे. त्यात थोडे बेसनाचे पीठ घालायचे आणि मग त्याचे कटलेट तयार करायचे.