दोन मिनिटांत करा मसाला चणे 

घरी करा एकदम मस्त मसाला चणे. करायला सोपे आणि चवीला भारी. 

चणे-दाणे हा स्नॅक्समधील फार लोकप्रिय असा पदार्थ आहे. याला टाईमपास असेही म्हटले जाते. काम करताना गप्पा मारताना चणे खायला अनेकांना आवडतात. 

साधे चणे तर आपण खातोच मात्र मसालेदार चणे किंवा खारे चणे असेही प्रकार मिळतात. 

असे चविष्ट चण्याचे प्रकार घरीही करता येतात. त्यासाठी विकतचे चणे घ्यायची काहीच आवश्यकता नाही. 

घरीच मस्त मसालेदार चणे तयार करणे अगदीच सोपे काम आहे. 

त्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल घ्यायचे. तेल जरा तापले की त्यात कडीपत्ता घालायचा आणि परतायचा. 

थोडे जिरे आणि मोहरी घालून फोडणी तयार करा आणि परतून घ्या. गॅस बंद करा.

गॅस बंद केल्यावर त्यात थोडी हळद आणि लाल तिखट घाला आणि त्यावर चणे घाला. व्यवस्थित ढवळून घ्या. 

सगळ्या चण्यांना मसाला लागला की गॅस चालू करा आणि अगदी मिनिटभर परतून घ्या. 

चवीला फारच मस्त लागतात. करायला अगदीच सोपे आहेत. असे मसाला चणे नक्की खाऊन पाहा. 

Click Here