बटाटा उकडून जसे पदार्थ करता तसेच किसूनही करा. चवीला एकदम मस्त आणि कुरकुरीत असतात.
बटाट्याचे विविध पदार्थ करता येतात. त्यापैकी काही पदार्थ बटाटा न शिजवता त्याचा किस करुन करता येतात.
हे पदार्थ छान कुरकुरीत होतात. तसेच झटपट होतात. फक्त बटाटा सोलून त्याचा केलेला किस थोडावेळ पाण्यात बुडवून ठेवायचा.
बटाट्याचे मस्त चमचमीत आणि कुरकुरीत असे थालीपीठ करता येते. हे थालीपीठ चवीला एकदम मस्त असते आणि झटपट करता येते.
बटाट्याचा किस हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय असा उपासाचा पदार्थ आहे. जिरं, तूप, हिरवी मिरची असे बेसिक पदार्थ घालून मस्त थालीपीठ करता येते.
बटाचा किसून तो किस वाळवायचा. नंतर तळून कुरकुरीत झालेला किस तळायचा आणि त्याचा मस्त चिवडा करता येतो.
किसलेल्या बटाट्याची एकदम मस्त आणि कुरकुरीत भजी करता येते. चवीलाही वेगळी लागते. नाश्त्यासाठी नक्की करुन पाहा.
किसलेल्या बटाट्यात कोबी, गाजर, बीट तसेच मटार असे पदार्थ घालून त्याचे मस्त खमंग आणि खुसखुशीत कटलेट करता येते.