काही जणांच्या टाचा कायम भेगाळलेल्या दिसतात. बघा काय असू शकतात यामागची कारणं..
हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे टाचांना भेगा पडणं साहजिक आहे.
पण काही जणांच्या टाचा आणि ओठही वर्षभर भेगाळलेले, कोरडे पडलेलेच असतात.
त्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी ३ चं प्रमाण कमी आहे.
शरीरात जर व्हिटॅमिन ई कमी प्रमाणात असेल तर त्यामुळेही टाचांना भेगा पडतात. त्यामुळे व्हिटॅमिन ई असणारे पदार्थ अधिकाधिक खावेत.
झिंक, व्हिटॅमिन सी, ओमेगा ३ फॅटी ॲसिड या पदार्थांच्या कमतरतेमुळेही टाचांना भेगा पडतात.