आपल्या जन्मतारखेचं आणि रंगांचं काय गणित असतं ते पाहूया...
असं म्हणतात की १, १०, १९ आणि २८ या तारखांना ज्यांचा वाढदिवस असतो त्यांनी सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत.
ज्यांची जन्मतारीख २, ११, २०, २९ असते त्यांच्यासाठी मोतिया किंवा चंदेरी रंग शुभ मानला जातो.
३, १२, २१ आणि ३० या तारखेला जन्मलेल्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे त्यांनी नारंगी रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे.
ज्यांची जन्मतारीख 4, 13, 22, 31 असते त्या लोकांनी हिरव्या रंगाचे कपडे जास्तीत जास्त वापरावेत.
५, १४ आणि २० तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी फिरोजी किंवा निळा रंग शुभ मानला जातो.
6, 15, 24 या तारखांना जन्मलेल्या लोकांनी लाईट पिंक रंगाचे कपडे महत्त्वाच्या कामाकरिता जाताना घालावेत.
७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेल्या लोकांनी निळा किंवा इंडिगो रंग घालण्यास प्राधान्य द्यावे.
ज्यांचा वाढदिवस ८, १७ आणि २६ तारखेला असतो त्यांच्यासाठी बैंगनी रंग शुभ मानला जातो.
९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्या लोकांनी लाल रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे.