फळं वेगवेगळी खाण्यापेक्षा जर २ फळं एकत्र करून खाल्ली तर त्यामुळे शरीरातलं लोह वाढण्यास मदत होते.
अशा फ्रुट कॉम्बिनेशन्सपैकी एक आहे पेरू आणि डाळिंब. पेरूमधून व्हिटॅमिन सी मिळतं तर डाळिंबामधून लोह मिळतं.
खजुरामध्ये असणारं लोह संत्रीमधल्या व्हिटॅमिन सी मुळे शरीरात लवकर शोषून घेतलं जातं. त्यामुळे संत्री आणि खजूर एकत्रित खाणे जास्त फायद्याचे ठरते.
द्राक्ष आणि किवी एकत्र करून खाणेही हिमोग्लोबिनची पातळी झटपट वाढविण्यासाठी मदत करणारे ठरते.
हिमोग्लोबिन वाढविणारं आणखी एक मस्त कॉम्बिनेशन म्हणजे स्ट्रॉबेरी आणि अंजीर एकत्रित खाणे.
आवळा आणि काळी द्राक्ष एकत्र करून खाणेही ॲनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष फायदेशीर ठरते.