पावसाळ्यात घसरेल पाय? 'या ' चपला वापरताय का?

पावसाळ्यात या चपला अजिबात वापरु नका. पाय घसरुन पडायची शक्यता जास्त. 

पावसाळ्यात सगळीकडे निसरडे झालेले असते. चिखल, शेवाळं, ओल या सगळ्या गोष्टींमुळे चालतानाच काय उभ्याउभ्याही पाय घसरतात.

पावसाळ्यात पाय घसरुन पडणे तसे फारच सामान्य आहे मात्र मार जोरात लागल्यावर गंभीर दुखापतही होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे फार गरजेचे असते.

पावसाळ्यात योग्य चपल वापरणे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. चपला चांगल्या असतील तर पडायची शक्यता कमी असते. चालताना पायही घसरत नाही.

महिलांनी उंच टाचांच्या चपला पावसाळ्यात अजिबात वापरु नयेत. त्या चपलांमुळे पडण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. चपलेला ठोकळा नसेल तर उत्तम असेल तर अगदी लहान असावा. 

स्लीपर हा प्रकार सगळ्यात जास्त वापरला जातो. पावसाळ्यात मात्र शक्यातो स्लीपर घालणे टाळायला हवे. पायात चिखल जातो आणि पाय घसरतो. 

गादीसारखा मऊ सोल असलेल्या चपला पावसाळ्यात जड होतात. तसेच त्यांना ग्रीपही एकदम कमी असते. त्यांचा वापर टाळावा. 

अतिवापरामुळे गुळगुळीत झालेल्या चपला पावसाळ्यात वापरु नका. नवीन चपला घ्या. झिजलेल्या चपला वापरल्याने पायाला गरजेचा असलेला आधार मिळत नाही. 

Click Here