कॉलेजला असताना पिंपल्सची मला फार लाज वाटायची. असे म्हणत साईपल्लवीने सांगितला अनुभव.
सुंदर दिसण्यासाठी फार काही करायची गरज नाही असे ठाम मत असणारी सुपरस्टार साईपल्लवी तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी कायमच चर्चेत असते.
साईपल्लवीला मेकअप वगैरे करायला आवडत नाही. तिच्या चेहर्यावरील मुरुम आणि डागांमुळे तिला अजिबात लाज वाटत नाही असे ती कायम सांगते.
मात्र कोणालाही असा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आधी ती व्यक्ती फार मानसिक त्रासांतून जाते आणि तसे काहीसे साईपल्लवी सोबतही घडलेच होते.
अनेक मुलींना त्यांच्या सौंदर्याविषयी शंका असतात. किशोरवयात तर फारच अति विचार केला जातो. साईपल्लवीलाही तारुण्याची सुरवात होत असताना पिंपल्स आणि स्वतःच्या आवाजाबद्दल शंका होत्या.
आपला आवाज चांगला नाही किंवा चेहऱ्यावर पिंपल्स आहेत म्हणजे दिसायला आपण खराब आहोत असे तिला वाटायचे. सगळ्यांनाच अशा शंका असतात.
मात्र आज तिला शंभर ट्रिटमेंट्स करु शकता येतील, तरी साईपल्लवी नैसर्गिक ठेवण जशी आहे तसेच राहायला हवे असा सल्ला देते. साधी काळजी घेऊनही अत्यंत सुंदर दिसता येते याचे ती उदाहरण आहे.
अनेक महिलांना असा त्रास असतो. अशा महिलांना स्वत:ला कमी लेखू नका असा संदेश साईपल्लवी कायम देते.
किशोरवयातील सगळ्या प्रश्नांवर मात करता येणे महत्वाचे असते. आणि साईला ते अगदी बरोबर जमले आहे. त्यामुळे मुरुम पिंपल्स हे सारे नैसर्गिक असते त्याची काय लाज वाटायची असे साईपल्लवी कायम बोलताना दिसते.