हिवाळ्यात भांडी धुताना हात गारठून जाऊ नयेत म्हणून...

हिवाळ्यात भांडी धुण्यासाठी थंडगार पाण्यात अजिबात हात घालावा वाटत नाही.

थंड पाण्यात हात घालून ते इतके गारठून जातता की त्यामुळे मग भांडी धुण्याचं कामच नकोसं वाटायला लागतं.

म्हणूनच आता तुमचं हे काम सोपं होण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..

बाजारात रबरी हॅण्डग्लोव्ह्ज मिळतात. ते वापरून तुम्ही भांडी धुवू शकता. हे ग्लोव्ह्ज ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही मागवता येतील.

थंड पाण्यात हात घालण्यापुर्वी हाताला भरपूर तेल किंवा व्हॅसलिन लावून घ्या. यामुळे पाण्याचा थंडावा जरा कमी जाणवतो.

शक्य असेल तर रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर भांडी धुण्याऐवजी दुपारच्यावेळी थोडं ऊन पडल्यानंतर भांडी धुवा.

Click Here