बेसन पीठ जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा...
बेसन आपल्याला स्वयंपाकात नेहमीच लागतं. त्यामुळे आपण ते थोडं जास्तीचं आणून ठेवतो.पण पिठात नेमक्या अळ्या दिसायला लागतात, किडे होतात.
असं झालं असेल तर सगळ्यात आधी बेसनाच्या पिठाचा खराब झालेला भाग बाजुला काढून फेकून द्या आणि पीठ हलकंसं गरम करून घ्या.
बेसनाच्या पिठाच्या डब्यामध्ये तेजपान घालून ठेवल्याने पिठात किडे, अळ्या होत नाहीत.
लवंगाच्या वासामुळेही बेसन पिठाला किड लागत नाही. त्यामुळे त्या पिठात थोड्या लवंगाही घालून ठेवा.
बेसन पीठ जास्त दिवस टिकण्यासाठी कडुलिंबाची पानंही खूप उपयोगी ठरतात. डब्याच्या आत तसेच डब्यावरही कडुलिंबाची पानं घालून ठेवा.
एका कागदामध्ये हिंग घेऊन तो बेसन पिठाच्या डब्यात ठेवा. पीठ जास्त दिवस टिकेल. किडे, अळ्या होणार नाहीत.