हिवाळ्यात त्वचा कोरडी पडायला सुरुवात झाली की डोक्यातला कोंडाही वाढू लागतो.
म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा, जेणेकरून डोक्यातला कोंडा वाढणार नाही.
आयुर्वेद एक्सपर्ट आचार्य बाळकृष्ण सांगतात की भिजवलेल्या मेथ्या आणि दही यांचा मास्क लावल्याने कोंडा कमी होतो.
हा मास्क केसांच्या मुळाशी लावा आणि १ तासाने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा.
आवळा आणि तेजपान एकत्र करून त्यांचा लेप डोक्याला लावल्यास कोंडा कमी होतो. आवळा पावडरही तुम्ही वापरू शकता.
हा उपाय १५ दिवसांतून एकदा करा. कोंडा कमी होऊन केस गळणं कमी होईल.
डोक्याच्या त्वचेला नियमितपणे दही, लिंबू असे पदार्थ लावल्यासही कोंडा कमी होऊ शकतो.