मोबाईलचं व्यसन कमी करण्यासाठी ५ टिप्स

तुम्हालाही सतत मोबाईल पाहात बसण्याची वाईट सवय लागली असेल तर पुढे सांगितलेले उपाय करून पाहा...

सतत मोबाईल पाहण्याचं वेड मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी घातकच असतं. म्हणूनच काही खास टिप्स...

कितीही वाटलं तरी झोपेतून उठल्यावर मोबाईल पाहणं टाळा. कमीतकमी अर्धा ते एक तास तरी मोबाईलपासून दूर राहा.

जेवण करताना, टॉयलेटमध्ये, झोपण्यापुर्वी अशा काही वेळेला तरी मोबाईलचा वापर कटाक्षाने टाळा.

सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स बंद करा आणि अगदी ठरवून रोज ३ ते ४ तासांसाठी ते पाहूच नका.

दर आठवड्यातून एक दिवस असा निवडा ज्या दिवशी डिजिटली डिटॉक्स व्हा. म्हणजेच मोबाईल, सोशल मीडियापासून पुर्णपणे दूर राहा. 

झोपण्यापुर्वी फोन हॉलमध्ये ठेवून द्या आणि मगच बेडरुममध्ये जाऊन झोपा. कारण यावेळेला मोबाईल पाहात बसण्याची सवय बहुतांश लोकांना असतेच.. 

Click Here