फक्त व्हॅलेंटाईन डे नाही, तर अख्खा व्हॅलेंटाईन वीक स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करण्याची अनेकांची इच्छा असते...
त्यासाठीच पुढे सांगितलेले काही पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात.
व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने तुमच्या पार्टनरसोबत मस्त कुठेतरी फिरायला जा..
कोणतंही गिफ्ट देण्यापेक्षा ट्रीपच्या निमित्ताने एकमेकांसोबत घालवलेला वेळ नक्कीच खूप यादगार असेल.
याशिवाय तुमच्या ट्रीपसाठी तुम्ही योग्य ठिकाणाची निवड केली तर तुमची ट्रीप खूप रोमँटीकही होऊन जाईल.
त्यासाठी तुम्ही मनाली, उटी, सिक्कीम, मेघालय अशा निसर्गरम्य परिसरांचा नक्कीच विचार करू शकता.
खूप दूर जाण्याची इच्छा असेल तर विदेशात जा किंवा मग कमी वेळात मस्त ट्रिप करायची असेल तर कारने जाण्याचा पर्याय निवडा आणि कुठेतरी जवळच्या ठिकाणी जा.. .