मुलांना पिझ्झा खूप आवडतो. पण मैद्याचा पिझ्झा त्यांना खाऊ घालायला नको वाटते. म्हणूनच रवा पिझ्झाची ही सोपी रेसिपी पाहा.
यासाठी एका भांड्यात रवा, दही आणि थोडंसं पाणी घेऊन घट्ट मिश्रण तयार करा. त्यात मीठ, ओरिगॅनोही घाला.
यानंतर नॉनस्टिक तव्याला थोडंसं तेल लावून घ्या. त्यावर बॅटर टाका.
यानंतर त्या बॅटरवर पिझ्झा सॉस आणि टोमॅटो सॉस लावून घ्या. त्यावर किसलेलं चीज भरपूर प्रमाणात घाला.
त्यानंतर त्यावर सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, कॉर्न अशा तुमच्या आवडीच्या भाज्या घाला.
१० ते १२ मिनिटे तव्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. रवा पिझ्झा तयार.