उरलेल्या इडलीपासून करा चटपटीत गुंटूर इडली

गुंटूर इडली हा चटपटीत पदार्थ नाश्त्यासाठी अतिशय बेस्ट आहे..

इडली हा कित्येकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. जर इडल्या खूप उरल्या असतील तर त्यापासून गुंटूर इडली करून पाहा.

गुंटूर इडली करण्यासाठी इडलीचे बारीक बारीक काप करून घ्या.

५ ते ६ गुंटूर मिरच्या, धने, जिरे, हिंग, उडीद डाळ, हरबरा डाळ, चणा डाळ, तीळ हे सगळं हलकं भाजून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्या. 

त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवून त्यात तूप घाला. तयार केलेला मसाला आणि इडलीचे काप त्यात घालून परतून घ्या.

चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून सगळं एकदा हलवून घ्या. चटपटीत गुंटूर इडली झाली तयार..

Click Here